सवय

आज हा फोटो पाहिला आणि डोळे पाणावले. रोज खायला अन्न मिळेल की नाही याची शाश्वती नसताना सुद्धा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला आपल्या घासातला घास काढून देणारे हे लेकरू मनाने अंबानी पेक्षाही श्रीमंत आहे.यावरून आजोबांनी लहानपणी सांगितलेली गोष्ट पुन्हा आठवली ती पुढील प्रमाणे जशीच्या तशी देतो. डोक्यावर मध्यांनीचा सूर्य आग ओकत होता अठरा विश्व दारिद्र् झोपडीत ठाण मांडून बसलेले.घरातली स्त्री आज मुले शाळेतून घरी आली तर त्यांना खायला द्यायला घरात अन्नाचा दाणा नाही आता लेकरांची भूक कशी भागवायची ? या चिंतेत असतानाच बाहेरून माई भिक्षा दे म्हणून आवाज देत एक संन्यासी दारात उभा राहिला.महाशिवरात्रीच्या घरी जणू एकादशी जेवायला आली आपल्या दुःखाने गांजलेल्या त्या माउलीने जरा त्रासिक चेहरा करूनच संन्याशाला जा बाबा पुढे माझ्या कडे काही नाही तुला द्यायला असे सांगितले.पण संन्याशी मात्र जणू हट्टाला पेटला अश्या स्वरात म्हणला माई जे काही असेल ते दे नाही म्हणू नकोस.आता मात्र त्या माऊलीचा संताप झाला रागाने ती म्हणाली अरे माझ्याच लेकरांना काही खायला नाही तुला काय देऊ चुलीतली राख ?संन्याशी विनम्र ...