देणाऱ्याचे हात
मित्रा बरोबर काल जेवायला गेलो होतो जेवून बाहेर पडलो तसा मागून कुणी तरी हाक मारली निनाद सर...तसे मी आणि मित्र थांबून मागे बघितले तर एक चाळिशीतला माणूस मला थांबायची खूण करत धावत माझ्या दिशेने येत होता.पॉश कपडे भारीतला गॉगल आधी मी ओळखलेच नाही पण जसा जवळ आला तसे लक्षात आले अरे हा तर विजू.
काय सर किती वर्षांनी भेटताय विजू रस्त्यातच वाकून नमस्कार करत म्हणला.मी जरा त्याच्या रस्त्यातल्या नमस्काराने असहज झालो म्हणले अरे नमस्कार काय करतो लहान आहे का तू आता ? तर हसून मला म्हणला सर तुमचे उपकार आहेत माझ्यावर.तुम्ही मला नोकरी लावली होतीत न त्या कंपनीच्या पुण्यातल्या ब्रँच चा मॅनेजर झालोय ही तुमचीच कृपा.म्हणलं अरे वेडा आहेस का रे ? नोकरी साठी मी फक्त शब्द टाकला होता नोकरी तुला मिळाली ती तुझ्या पात्रतेमुळे.आता मॅनेजर झालास ते तुझ्या कष्टाळू पणा आणि प्रामाणिकपणा मुळे यात माझे कसले आले श्रेय ? असे नाही सर विजू जरा कळवळूनच म्हणला.अहो जेव्हा मला खरच गरज होती तेव्हा तुम्ही धावून आलात माझ्या साठी देवा सारखे.वाईट दिवसातून बाहेर आलो ते तुमच्या त्या एका शब्दा मुळेच आणि वाईट दिवसात ज्यांनी साथ दिली त्यांना विसरणे कसे शक्य आहे ? पण मी नाराज ही आहे तुमच्यावर माझ्या मुलाच्या बारश्याला आलात त्यानंतर आजतागायत घरी नाही आलात.या की एकदा मुक्कामीच 4 रूमचा फ्लॅट आहे आपला तुमचे आदरातिथ्य तर करायची संधी द्या मला.अरे येईन नक्की तेव्हढ्यात मित्राने बुक केलेली कॅब आली तसा त्याचा नंबर घेतला आणि त्याला निरोप देऊन कॅब मध्ये बसलो.
मित्र म्हणला कोण रे हा विजू ? अरे लोणावळ्यात होता रहायला घरची परिस्थिती गरीब पण पोरगा हुशार शिकला होता चांगला हा ज्या कंपनीत आहे न त्या कंपनीच्या मालकाचा मुलगा माझा खास दोस्त सगळी फॅमिली ओळखते मला त्याच्या वडिलांना सांगितले त्यांनीही बायोडेटा बघून याला नोकरी दिली इतकाच तो माझा काय संबंध याच्याशी.मी काही केले नाही रे फक्त धागा जुळवून दिला आणि यात कसले उपकार बाकी त्याने त्याच्या कर्तृत्वावर मिळवले ते त्याचे श्रेय.कसे आहे मित्रा आपले दिवस वाईट असले न की कुणी तरी आधार द्यावा असे वाटते खरे तसा तो द्यावा ही पण दिवस चांगले आले की तिथून आपण बाजूला व्हायचे.त्या कथे पुरती आपली भूमिका संपलेली असते.आपण भूतकाळात केलेल्या मदतीचे वर्तमानात आणि भविष्यात कशाला कोणी ओझे वहावे ? एकदा समोरच्याचे सगळे चांगले झाले की तिथून बाजूलाच व्हायचे.माझी आई सांगायची नेहमी निनाद कमी तिथे आम्ही असे वागावे ज्यांच्या कडे भरपूर आहे त्याच्या पेक्षा ज्यांच्या कडे कमी आहे अश्याच्या पाठीशी उभे रहावे,आपल्याला जमेल तसे आणि जमले तितके.आणि मला नाही आवडत आपण केलेल्या मदतीला कुणी उपकार मानणे.माणसाने माणसाला सहज मदत करणे हे सहाजिक असायला हवे त्याचे कोणी ओझे बाळगले की दुःख होते.आपण मदत करतो ही काळाची गरज म्हणून कुणी उपकार मानावेत म्हणून नाही.आणि हा आपण निरपेक्ष मनाने केलेल्या मदतीचा अपमानच असतो एक प्रकारे.म्हणून मी नेहमी एक पथ्य पाळतो एखाद्याला मदत करताना जेव्हा लक्षात येते की आता याला आपल्या मदतीची गरज नाही त्याचे सगळे सुरळीत सुरू झाले आहे की तिथून आपला मुक्काम हलवायचा मागे वळून न पहाता. पुन्हा नव्याने शोधायचे कुणाला मदतीची गरज असेल त्याची मदत करायची.लोक म्हणतात गरज सरो वैद्य मरो पण माझे उलटे म्हणणे आहे गरज संपते आहे म्हणल की एकदा वैद्यानेच स्वताला तिथून बाजूला करायचे जेणे करून कोणी वैद्याचे मरण चिंतणार नाही.आणि मी पण काय फार मोठे करत नाही संकटे माझ्यावरही आली जितके संकट मोठे तितकी मोठी सागरा सारखी माणसे पाठीशी उभी रहात गेली.आणि त्यांच्या ऋणात मी रहाणे त्यांनाही आवडले नसते म्हणून त्याची थेंबभर परतफेड करत असतो.जग तर असेच हातात हात घालून चालायला हवे न ? एखाद्या पडणाऱ्याला आपण सावरतो पण तेव्हढ्या वेळे पुरतेच एकदा तो त्याच्या पायावर सावरून उभा राहिला की त्याला त्याच्या मार्गाने जाऊन देण्यातच शहाणपणा आहे.कशात गुंतून पडायचे नाही रे बाबा गुंता झाला न की कधी तरी तोडावे लागते.आणि खर सांगू तुटताना खूप त्रास होतो.आणि हळव्या माणसांनी तर कधीच गुंतू नये गुंतलात तर आयुष्यभर यातना भोगायची तयारी ठेवायची.मित्र काही बोलणार तेव्हढ्यात माझ घर आल्या मुळे कॅब थांबली.मित्राला बाय करून कॅब मधून उतरलो तेच डोळ्यातला अश्रूंचा गुंता रुमालाने पुसत सोसायटीत आलो.
निनाद

Comments
Post a Comment