Posts

Showing posts from July, 2019

आमची येरवडा यात्रा(2)

मगाच पर्यंत थ्रिलचा आनंद लुटून झाला आता येरवडा कारागृहातील प्रशासनीक अधिकाऱ्याने सगळ्या नोंदी आणि तपासण्या पूर्ण करून आम्हाला अधिकृत राजकीय कैद्यांचा दर्जा दिला.आत नोंदी करताना पोलीस आईचे नाव काय विचारत(ते का ? याचा उलगडा सुद्धा त्या गडबडीत विचारुन घेतला)मग वडिलांचे,तसे त्या पोलिसाने त्याच्या खाक्यात बापाचे नाव असा प्रश्न केल्या बरोबर पोरे भडकली ओ नीट बोला बापाचं काय म्हणता ?वडील म्हणा नीट. देशभक्ती बरोबर पितृभक्ती जागृत पाहून त्या पोलिसांचे वरिष्ठ त्या पोलिसाला म्हणले अरे ते सगळे चांगल्या घरचे आहेत त्यांना नीट वागणूक द्या तसे पोलीस बापा ऐवजी वडिलांचे नाव काय तुझ्या ? असे साजूक स्वरात विचारू लागले. हे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर आमची रवानगी त्यांनी बराकीत केली. तुरुंगात रवानगी म्हणजे संकटच  पण आमची कथाच वेगळी हे सगळे कट्टर हिंदुत्ववादी ठेवले कोणत्या बराकीत ? तर महात्मा गांधी बराकीत.बिचारे गांधीजी...हे राम बराकीत सोडायला आलेल्या पोलिसाने आम्हाला बराकीत नेले तेव्हा तिथे किमान ऐंशी नव्वद कच्चे कैदी रहात होते.कोणी पाकिटमार,कुणी भूरटा चोर नाना तऱ्हेचे गुन्हेगार पण सगळे लहान वयातील ...

आमची येरवडा यात्रा

आमची येरवडा यात्रा. 1991 सालची गोष्ट असेल ही तसं पाहिलं तर 1990चे दशक हे अस्वस्थ दशक म्हणले पाहिजे.याच काळात काश्मीर मध्ये फुटीरतावादी जोरात होते आणि देशात अस्थिर सरकार.त्याच काळात भारतीयांना अस्वस्थ करणारी आणि चीड आणणारी बातमी आली श्रीनगर मध्ये तिरंगा जाळल्याची व्हिडीओ कैसेट समोर आली.संताप तर होताच मनात पण त्याला व्यक्त करायची गरज होती. 12 एप्रिल 1990ची रात्र असेच आम्ही काही विद्यार्थी परिषदेचे मित्र रात्री मित्राच्या रूम वर बसलो असताना बोलता बोलता एक कल्पना सुचली की आपण पण पाकिस्तानचा झेंडा जाळू. बस... सगळ्यांना कल्पना आवडली मग काय तयारी लगेच सुरू. उद्या सकाळीच झेंडा जाळायचा कार्यक्रम ठरला म्हणून रात्री 1 वाजता एका कपडा दुकानदाराला घरून उठवून हिरवा आणि पांढरा ब्लाउज पीस आणून त्याचा झेंडा आणि मांजर पाटाचे कापड घेऊन त्याचे दोन पुतळे एक बेनझीर भुट्टो चा आणि दुसरा POKचा पंतप्रधान अनामुल्ला खान असे सगळे बंदोबस्त करून सगळे घरी गेलो ते सकाळी 9 वाजता भाजी मंडई चौकात हे आंदोलन करायचे हे ठरवूनच. सकाळी प्रत्येक मित्राला आणि कार्यकर्त्याना निरोप देऊन ताबडतोब येण्याच्या सूचना केल्या.33 मुले ...