एका आजोबांची गोष्ट
रिपोस्ट
एका आजोबांची गोष्ट.
माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट माहीत आहे ना? आता ती गोष्ट पुढच्या पिढीत आली टोपीवाल्याचा नातू विश्वमभर मोठा होऊन आजोबा सारखे टोप्या विकायला निघाला.
निघताना आजोबा म्हणाला अरे जातो आहेस पण त्या जंगलातून जाऊ नकोस बर मागच्या वेळेस मी वाचलो माहीत आहे ना ? विश्वमभर म्हणाला हो मला सगळे माहीत आहे आणि असतेच.
वाटेत विश्वमभर मनात म्हणाला अरे आपण तर हुशार मग माकडांना का घाबरायचे? आपण त्याच जंगलातून जाऊ म्हणून त्याने जंगलाचीच वाट पकडली.जंगलाच्या मध्यावर आल्यावर त्याला पण आजोबा सारखी झोप आली आणी तो पण एका झाडा खाली टोपयांची पेटी ठेऊन झोपला.तासाभरा नंतर विश्वमभर जागा झाला आणि पाहातो तर आजोबा सारखीच विश्वमभर ची गत झाली होती पेटीतील सगळ्या टोप्या माकडांनी पळवलेल्या.
विश्वमभर मनात म्हणला चायला उगाच इकडून आलो तरी आजोबा सांगत होताच इतक्यात त्याला आजोबांनी टोप्या कश्या परत मिळवल्या ते आठवले.विश्वमभर उठून उभा राहिला पेटी उघडीच होती त्याने माकडांना दाखवून स्वताच्या डोक्यावरची टोपी रिकाम्या पेटीत टाकली आणि माकडे कधी टोप्या पेटीत टाकतात त्याची वाट पाहू लागला.तेव्हढत एक काळे धिप्पाड वानर उडी मारून खाली आले,आणि विश्वम्बरच्या एक जोरात श्रीमुखात भडकावून म्हणाले च्यायला आजोबा काय तुला एकट्यालाच होते का रे चोधरीच्या ?
तात्पर्य काय लै आजोबाच्या जीवावर उडया मारू नका दुसऱ्याना पण आजोबा असतो.
निनाद
Comments
Post a Comment