#मैत्री
मैत्री कर्णा आणि दुर्योधनाची होती तशीच कृष्ण सुदाम्याची होती.एकदा सुदाम्याने कृष्णाला विचारले कृष्णा मी असा गरीब तू स्वता ऐशवर्यवंत तरी सुद्धा why are you in my list ? कृष्णच तो मंद स्मित करत सुदाम्याला म्हणाला शेवटी तू पण आलास तर फेसबुकवर ?भोळा सुदाम्या चकित होऊन म्हणाला अरे हो पण तुला कसे कळले ? किती भोळा आहेस मित्रा ? आणि या तुझ्या निर्व्याज भोळेपणाचाच मी चाहता आहे.अरे वेड्या मी चराचरात आहे माहीत आहे ना तुला ? मग फेसबुकच काय घेऊन बसलास अरे ते तर स्वताच नकळत का होईना कृष्णमय तर जन्मतः च आहे.
सुदाम्या तुला आठवतात आपले गुरुकुलातील दिवस ? एकत्र शिकलो, खेळलो पेंद्या,लंगड्या असे तुम्ही किती तरी सहकारी मला कुण्या राजपुत्रा पेक्षा जवळचे होतात ते तुमच्या गुणांमुळे.
मुळात मैत्री ही कोणत्याही कारणानी नाही तर गुणांनी होते.कोणत्याही कारणांनी होतो तो "व्यवहार" आणि गुणांच्या मुळे होते ती "मैत्री".
तू मला भेटायला येताना जे पुरचुंडी भर पोहे आणले होतेस ना अश्या पोह्याची डिलिव्हरी ना कोण्या झोमोटोला जमणार ना कुण्या स्विगीला शक्य होणार.अरे हजारो जण फोल्लो करतात मला हजारो भक्त आहेत पण स्वताची झोळी फाटकी असताना तू माझ्या साठी आणलेले ओंजळ भर पोहे माझी आयुष्यभराची भूक मिटवून गेली.इतका जीव लावणारा मित्र जर माझ्या यादीत नसता तर नवलच.ऐकता ऐकता सुदाम्याचे डोळे पाणावले डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत कृष्णाला आलिंगन देऊन म्हणाला मित्रा उत्तर मिळाले मला मी तुझ्या यादीत आहे कारण मी भाग्यवान आहे.सुदाम्याचे डोळे पुसत भगवंत हसत म्हणाले तुला फेसबुक वर रिक्वेस्ट पाठवलीय ती स्वीकार आता म्हणत बासरी वर सूर लावला "सूर निरागस हो".
निनाद
Comments
Post a Comment