अव्यक्त गुलाब
# अव्यक्त गुलाब # संध्याकाळी वाटले होते तू येऊन जाशील पण तू आलाच नाहीस.कधी नव्हे ते मनाचा हिय्या करून तुला सांगणार होते. गुलाबाची कळी म्हणून खुलले ते वसंत आला म्हणून, आणि त्याच्या प्रेमात पडले बिनशर्त.वसंता नंतर माझी पहिली ओळख झाली ती तुझ्या मंद झुळकीशी. वसंत नव्हतास रे तू माझा पण सखा,मित्र तर नक्कीच होतास.वसंता पेक्षाही तुला माझ्या सुवासाचे कवतुक त्याला हाताला धरून बागभर बागडून माझ कवतुक करायचास ज्यांना आवडला त्यांना कवतुक करायला मोहात पाडलस.उन्हाने काहिली झाली आणि तू फुंकर घातली नाहीस असे कधीच झाले नाही.तुझी रूप तरी किती ...? कधी मंद झुळुक, कधी थंड बोचरा व्हायचास कधी चिडलास की सैरभैर होऊन सोसाट्याने वाहायचास. वसंत नव्हतास रे तू माझा पण वसंतालाही हेवा वाटेल असा सहवास होता आपला.तुझ्या सवे झुलताना तुझ्या सवे खुलताना चे क्षण आठवले तरी आताही अंगावर काटा येतो.तु सुद्धा अगदी शहाणा होतास पण थोडा वेडाही तुला फक्त इतकेच माहिती होते की तू माझा वसंत नाहीस पण ....इतरांच्या पेक्षा वेगळा होतास जवळचा ज्याच्या असण्याने मी खुलायच...