चाणक्य

मी कॉलेज मध्ये असतानाची गोष्ट असेच कॅन्टीन मध्ये टवाळ्या करत बसलो होतो बाहेरून वर्गातलाच एक जाड्या मित्र आला मी आवाज दिला ए हिप्पोपोटेम्स तो पण बिचारा  स्माईल देऊन पुढे निघून गेला.
  या गोष्टीला दोन दिवस उलटून गेले तिसऱ्या दिवशी गडी माझ्याशी भांडायला लागला म्हणल अरे पण मी तर तुला हिप्पोपोटेम्स दोन दिवसा पूर्वी बोललो होतो तर तू तीन दिवसांनी का आलास भांडायला ?तो म्हणला अरे तेव्हा मला अर्थ माहीत नव्हता आज बाबांनी फोटो दाखवला तेव्हा कळले.आम्हाला कळेना डोक्यावर हात मारून घ्यावा का पोट धरून हसावे.
गेले महिना दीड महिना चाणक्य या विषयावर कोणा कोणाला ही पदवी दिली जात आहे त्यावरून आठवले.
दीड दमडीच्या((मराठी म्हणा भारतीय म्हणा पण )पत्रकारितेची किव करावीशी वाटते जेव्हा कधी पवारांना कधी राउताना चाणक्य म्हणतात.
मुळात चाणक्य कधी स्वताच्या अस्तित्वा साठी लढला नाही.त्याची तपश्चर्या त्याचे परिश्रम हे राष्ट्र घडवण्यासाठी होते. या चाणक्याने सम्राट घडवला होता रे नरसाळ्यानो.
तुम्ही ज्याना चाणक्य म्हणताय ना त्यांना कालचे पोर फडणविसच्या निम्म्याच जागा निवडून आणता आल्या.आणि गेलेला पुतण्या परत यावा म्हणून केविलवाणा आणि हतबल नेता उभ्या महाराष्ट्राने पाहिला.मात्र मराठी पत्रकारिता त्याच्यात चाणक्य शोधण्यात दंग होती.कुठली पत्रकारिता ही यशवंतराव मुक्त विद्यापीठातली की रात्र शाळेतली ?
चाणक्याने ज्या नंद राजाला आव्हान दिले त्यालाच जाऊन मिळाला नव्हता कधी.मध्येच त्या राउंताना 
चाणक्य म्हणताय माझे तर वाक्य जबर हिट झाले सोशल मीडिया मध्ये राउंताना चाणक्य म्हणणे म्हणजे चायनिजच्या गाडी वरच्या नेपाळ्याला ब्रूस ली म्हणल्या सारखे आहे म्हणून.अरे चाणक्य वाचा तरी कुठे चाणक्याने कुणाचा विश्वासघात केला होता ?चाणक्याने सांगितलेल्या वचनांच्या उलट मित्रघात करणारे कधी पासून चाणक्य म्हणून ओळखले जाऊ लागले? आता सोशल मीडियाचा जमाना आहे क्षणात तुमच्या एकतर्फी पत्रकारितेचा बुरखा फाडला जातो तिथे.पण सगळ्यात हुशार मतदार आहेत या मीडियाचा वापर फक्त करमणुकी साठीच वापरतात.आपली मते बनवता ना मीडियाचा कोणताही प्रभाव न जुमानता मतदारांनी दोनदा मोदी सरकार आणि आता सुद्धा फडणवीस सरकारलाच कौल होता.फक्त गेला बाजार 3 पक्ष एकत्र येऊन लोकशाहीचा आणि पर्यायाने फडणवीसांचा विश्वासघात केला.
माझ्या दृष्टीने फडणवीस पराभूत नाहीत तर विश्वासघाताचे बळी आहेत.जाता जाता सांगतो माझ्या दृष्टीने तर पवार चाणक्य नाहीत तर खंजीराची जखम कपाळावर
घेऊन भटकणारा
"अश्वत्थामा"आहेत ज्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा अपूर्ण रहायला यांच्या वसंतदादांचा क्षणिक मोहा पायी केलेला विश्वासघातच कारणीभूत ठरला.रहातात राहिलीले उद्धव ठाकरे ज्या पवारांच्या शब्दावर उभा आणि आडवा सुद्धा महाराष्ट्र विश्वास ठेवत नाही त्यांच्या शब्दावर आपले राजकीय अस्तित्व पणाला लावताना पाहून आपण हळहळ व्यक्त करण्याचे व्यतिरिक्त काही करू शकत नाही.त्यामुळे तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे.
.

Comments

Popular posts from this blog

अव्यक्त गुलाब

काक स्पर्श

तुम .....