आमची येरवडा यात्रा

आमची येरवडा यात्रा.
1991 सालची गोष्ट असेल ही तसं पाहिलं तर 1990चे दशक हे अस्वस्थ दशक म्हणले पाहिजे.याच काळात काश्मीर मध्ये फुटीरतावादी जोरात होते आणि देशात अस्थिर सरकार.त्याच काळात भारतीयांना अस्वस्थ करणारी आणि चीड आणणारी बातमी आली श्रीनगर मध्ये तिरंगा जाळल्याची व्हिडीओ कैसेट समोर आली.संताप तर होताच मनात पण त्याला व्यक्त करायची गरज होती.
12 एप्रिल 1990ची रात्र असेच आम्ही काही विद्यार्थी परिषदेचे मित्र रात्री मित्राच्या रूम वर बसलो असताना बोलता बोलता एक कल्पना सुचली की आपण पण पाकिस्तानचा झेंडा जाळू.
बस... सगळ्यांना कल्पना आवडली मग काय तयारी लगेच सुरू. उद्या सकाळीच झेंडा जाळायचा कार्यक्रम ठरला म्हणून रात्री 1 वाजता एका कपडा दुकानदाराला घरून उठवून हिरवा आणि पांढरा ब्लाउज पीस आणून त्याचा झेंडा आणि मांजर पाटाचे कापड घेऊन त्याचे दोन पुतळे एक बेनझीर भुट्टो चा आणि दुसरा POKचा पंतप्रधान अनामुल्ला खान असे सगळे बंदोबस्त करून सगळे घरी गेलो ते सकाळी 9 वाजता भाजी मंडई चौकात हे आंदोलन करायचे हे ठरवूनच.
सकाळी प्रत्येक मित्राला आणि कार्यकर्त्याना निरोप देऊन ताबडतोब येण्याच्या सूचना केल्या.33 मुले आणि 12 मुली असे सगळे जमले पण नेमके पोलिसांनी आक्षेप घेतला.गावात 144 आणि 37/1 कलम लागू आहे तुम्हाला असे काही करता येणार नाही.आम्ही PI बिवल साहेबांशी बोललो खरे पण ते काही परवानगी देईनात.
झेंडा न जाळता परत जाणे म्हणजे अपमानच त्याला कोणीच तयार होईना.
शेवट साहेबांना सांगितले आम्ही बाहेर जाऊन मुलांना समजावतो.
गाफील राहिलेल्या साहेबाने त्याला परवानगी दिली पण आम्ही बाहेर येऊन सगळ्यांना सांगितले पोलीस परवानगी देत नाहीत तरी झेंडा जाळायचा आहे.असे सांगताच पटापटा झेंडा आणि पुतळ्यावर रॉकेल टाकून आग आग लावून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
आपल्याला फसवून या पोरांनी झेंडा जाळलाच याचे दुःख संतापात व्यक्त करत साहेबाने सगळ्यांना ताब्यात घ्यायचे आदेश दिले.
नियमा प्रमाणे सगळ्या नोंदी करे पर्यंत दुपारचे 1 वाजायला आले तो पर्यंत सगळ्या गावात बोंब झाली पाकिस्तानचा झेंडा जाळला म्हणून 55 जण अटक ते सुद्धा सगळी 16 ते 22 वयाची मुले.हळूहळू मुलांचे पालक जमा होऊ लागले आखा गाव पोलिस स्टेशन समोर.गावातील लोकांनीच आमच्या जेवणाची व्यवस्था केली.तिथून आम्हाला वडगाव कोर्टात नेले तिथे न्यायाधीश नाही म्हणून पुणे कोर्टात वरात. तिथे शरद पवार आले कळले म्हणून पोरांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या मग न्यायाधीश खवळला. त्याने मुलींना जामीन दिला आणि मुलांना मात्र न्यायालयांनी कोठडी सुनावली मग आमची रवानगी वडगाववरून थेट येरवड्या कडे रवाना  झाली मधल्या काळात वडगावकरांनी सरकारी जेवण (ज्याला पोलीस भत्ता म्हणतात.)न देऊ देता स्वता्चया खर्चाने आमच्या जेवणाची व्यवस्था केली.येरवडा जेल मध्ये पोचे पर्यंत आमच्या सोबत असलेले 4 पोलीस जाम वैतागले होते.कारण या 33 जणात आम्ही 4 जण त्यांच्याच सिगरेट ओढून त्यांची 4 पाकिटे दिवस भरात संपवली होती.आम्हाला येरवडा प्रशासनचया ताब्यात दिल्यावर निघताना एक पोलीस जवळ येऊन म्हणाला सुद्धा आज भेटलात परत कधी चुकून ही भेटु नका.म्हणल काय साहेब नाराज झाले काय? तर म्हणला  आयुष्यात पहिल्यानंदी  आरोपींवर 4 पाकिटे सिगरेटचा खर्च झालाय माझा.सकाळ पासून सोबत असलेले पोलीस जाऊन आता आम्ही चित्रपटात दाखवतात तसे जेलच्या मेन गेट मधून आत गेलो.आपल्याला अटक झालीय आपण येरवडा तुरुंगात आलोय याचा ना कुणाला खेद ना खंत उलट या थ्रिलचा सगळे जण आनंदच लुटत होते. (क्रमशः)

Comments

Popular posts from this blog

अव्यक्त गुलाब

काक स्पर्श

तुम .....