चाणक्य
मी कॉलेज मध्ये असतानाची गोष्ट असेच कॅन्टीन मध्ये टवाळ्या करत बसलो होतो बाहेरून वर्गातलाच एक जाड्या मित्र आला मी आवाज दिला ए हिप्पोपोटेम्स तो पण बिचारा स्माईल देऊन पुढे निघून गेला. या गोष्टीला दोन दिवस उलटून गेले तिसऱ्या दिवशी गडी माझ्याशी भांडायला लागला म्हणल अरे पण मी तर तुला हिप्पोपोटेम्स दोन दिवसा पूर्वी बोललो होतो तर तू तीन दिवसांनी का आलास भांडायला ?तो म्हणला अरे तेव्हा मला अर्थ माहीत नव्हता आज बाबांनी फोटो दाखवला तेव्हा कळले.आम्हाला कळेना डोक्यावर हात मारून घ्यावा का पोट धरून हसावे. गेले महिना दीड महिना चाणक्य या विषयावर कोणा कोणाला ही पदवी दिली जात आहे त्यावरून आठवले. दीड दमडीच्या((मराठी म्हणा भारतीय म्हणा पण )पत्रकारितेची किव करावीशी वाटते जेव्हा कधी पवारांना कधी राउताना चाणक्य म्हणतात. मुळात चाणक्य कधी स्वताच्या अस्तित्वा साठी लढला नाही.त्याची तपश्चर्या त्याचे परिश्रम हे राष्ट्र घडवण्यासाठी होते. या चाणक्याने सम्राट घडवला होता रे नरसाळ्यानो. तुम्ही ज्याना चाणक्य म्हणताय ना त्यांना कालचे पोर फडणविसच्या निम्म्याच जागा निवडून आणता आल्या.आणि गेलेला पुतण्या परत यावा म्ह...