प्राजक्त अन प्रारब्ध"
" कथा म्हणली की कोणे एके काळी पासून नाही तर आटपाटनगरा पासूनच चालू व्हायला पाहिजे असा थोडी नियम आहे ? ही कथा मी स्वता बघितली आहे,अनुभवली आहे. गावाच्या वेशीवर एक भव्य वडाचे झाड कित्येक वर्षा पासून उभे होते.येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुला सावली देणे हेच त्यांचे ध्येय स्थितप्रज्ञा सारखाच वड ही कुणालाही वेगळं वागवत नसे आपल्या आश्रयाला सावलीला आलेला मनुष्य असो वा प्राणी त्याने सावली देताना कधीच भेदभाव केला नाही.हा पण सावली देत असला तरी त्याच्या आजूबाजूला त्याने कधीच दुसरे झाड उभे राहून दिले नाही म्हणा किंवा त्याचे भव्य रूप बघून कोणा झाडाची तिथे उगवायची हिम्मत पण झाली नाही कधी.पण आयुष्य माणसाचे असो प्राण्यांचे असो वा वृक्षाचे असो नेहमीच एक सारख आपल्याला हवे तसे थोडीच असते ? आणि झालेही तसेच भले भले जिथे उगवू शकले नाहीत तिथे एक प्राजक्ताच्या रोपाने जन्म घेतला. मोह माया या सगळ्या पासून दूर असलेल्या वडाला सुद्धा हे इवलेसे रोप पाहून आश्चर्य वाटले आणि कुतूहल पण.लहान मूल बघून एखादा क्रूर दरोडेखोर सुद्धा गहिवरतो ना मग हा तर स्थितप्रज्ञ वटवृक्ष होता.काही...